Site icon Youth Ki Awaaz

कहानी हर दिल की …

ही त्या वेळची गोष्ट आहे जेव्हा विजू एकटा होता. घरात नाही रे आयुष्यात एकटा होता.. ! (खुपच वात्रट विचार करता तुम्ही?) त्याला नेहमी वाटायच आपल्या आयुष्यात कुणीतरी आसव… someone special… आणि मग तो म्हणायचा…

“पल भर के लिये कोई हमें प्यार कर ले झूठा ही सही, दो दिन के लिये कोई इक़रार कर ले झूठा ही सही”… (खूपच आशावादी आहे हा बिचारा?)

पण त्याला आयुष्यात सोडा स्वप्नात सुद्धा कुणी मिळाली नाही… बस इंतजार के गम में एक पीछे एक बोतल खाली होती रही… पन जिंदगीमें माधुरी तो छोड़ो साधी गांगुबाई भी नहीं मिली..!! तरी त्याची कोशिशे बरकरार थी… तो कायम विचार करायचा…

“कहते हैं ख़ुदा ने इस जहाँ में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया हर किसी के लिए”…. 
(म्हणजे माझ्यासाठीही कुणाला तरी बनवलच असेल, नाही.??)

होप्स हो होप्स… फक्त होप्सच शिल्लक राहिले होते त्याच्या आयुष्यात. पर कहते हैं न ‘भगवान के घर मे देर है पर अंधेर नही’ फायनली एक दिवस… त्याच्या घराच्या अगदी समोर राहणाऱ्या खडूस शिंदे काकूकडे मीरा नावाची पेंगेस्ट आली, (नाव जारी मीरा असल तरी नावाच्या अगदी विरूद्ध… नाहीतर उगाच तुम्ही साधा, सरळ आणि सभ्य चेहरा डोळ्या समोर ठेऊन वाचाल?) आणि तिला पाहताक्षणी वाटल…

“तुम आये तो आया मुझे याद,गली में आज चाँद निकला
जाने कितने दिनों के बाद, गली में आज चाँद निकला”.. (वाह रे चांद..!?)

बस..! तिला पाहून वाटलं ‘हीच ती जिला आपण शोधत होतो’ bdw असं त्याला प्रेत्तेक मुलीला पाहून वाटायचं पण this time नेहमीसारखीच* एकदम स्ट्रॉंगवाली फिल्लिंग होती. ‘हीच ती मुलगी जिला देवाने आपल्या साठी बनवलय’. तिला पाहिलं की त्याला कूच कूच होऊ लागलं, आणि आता त्याच दिल ओरडून ओरडून म्हणत होत…

“ऐ हमनवा मुझे अपना बना ले,सुखी पड़ी दिल की इस ज़मीं को भीगा दे, हूँ अकेला ज़रा हाथ बढ़ा दे, सूखी पड़ी दिल की इस ज़मीं को भीगा दे”… 
(कशाने.? ते त्याच त्यालाच ठाऊक?)

मग काय.. ? प्रयत्न जोमाने सुरू झाले, सिगारेट अन दारू पेक्षा जास्त पैसे दाढी आणि फेरशल करण्यात गेले. मित्राचा का होईना पण एक शोभुन दिसारणार डिरेस* आणला आणि डियो गॉगल सारख्या ढापुन आणलेल्या वस्तू घरात होत्याच…वाईट व्यसना सह मित्र टाळायला सुरवात झाली, आणि खिडकीतून लपून-छापून तिला पाहत सुरू झालं…

“एक लड़की को देखा तो ऐसा लगा
जैसे खिलता गुलाब, जैसे शायर का ख़्वाब,जैसे उजली किरण, जैसे बन में हिरन, जैसे चांदनी रात…अन ब्ला ब्ला ब्ला”…
(देवा.! खरच प्रेमात माणूस वेडा आणि आंधळा होतो, बघा याला काय काय दिसतंय तिच्यात?)

ते काही असो, ह्या वेळेस विजूचं नशीब जोरात होत. नजरे भी मिली , इशारे भी हुये आणि फायनली पोरगी हसली न भावा.! और प्यार हो भी गया.. (XB-1 विमान जगातलं सर्वात फास्ट प्लेन आहे म्हणे पण यापेक्षा फास्ट तर याच प्रेम जमल…? सहीच न.!) अजून बाते मुलाकाते व्हायची बाकी होती तरी विजू एकदम वरच्या फ्लोर ला हवेत उडत होता, त्याच हे पहिल प्रम होत (कदाचित?) सो ये गाना तो बनता है बॉस…

“पहला नशा.. पहला खुमार..नया प्यार है.. नया इंतज़ार, कर लू मैं क्या अपना हाल, ऐ दिल-ए-बेकरार, मेरे दिल-ए-बेकरार, तू ही बता, पहला नशा.. पहला खुमार”.. 
(वाह.! मजा आ गया✌️)

मग काय.. ? दुनियासे छुपते छुपाते नंबर एक्सचेंज हुए… chat हुई , बाते हुई फिर मुलाकाते भी हुई… कॉफी की डिमांड हळू हळू डिनर तक गयी… आता तर तिच्या बिला समोर आयुष्य छोट्या वाटू लागल, तरी विजुच प्रेम कमी नाही झाल. (आणि झाल असेल तरी कुणाला सांगेल तो बिचारा, कारण ही सोडून गेली तर दूसरी कधी/कशी/कुठे मिळेल याची काय खात्री..?) जरी तिला वरन भात करता येत नसला तरी विजुने सात जन्म सोबत राहायची वचन करुणच टाकली… मग,

“सातों जनम में तेरे, मैं साथ रहूँगा यार
मर भी गया तो मैं तुझे, करता रहूँगा प्यार“…
(इत्यादी वगैरे वगैरे ?)

Hmm अगदी असच ! पर ये प्यार है बाबू मोशाय दुनिया से कितना भी छुपाव छुपानेसे नही छुपाता… शेवटी सर्वाना माहीत झालाच. विजू आख्या कॉलनित बदनाम झाला पन याच काही दुःख नाही हो, वडिलांनी दोन वेळा चोपुन बदड़ला हे मात्र खुप वाईट झाल…! स्टील , तरीपन “प्यार किया तो डरना क्या” हे वाक्य मनाशी धरून विजू वाहत होता.. “ये जमाना हमे कितना भी क्यों न रोके मैं तुमसे प्यार करता रहूंगा मीरा.!” बघा त्याच प्रेम तिळमात्र कमी झाल नाही.. आणि ते पाहुन ह्या वेळेस मीरा म्हणाली..

जनम जनम जनम, साथ चलना यूँही
कसम तुम्हे कसम, आके मिलना यहीं
एक जान है भले,दो बदन हो जुदा
मेरा होके हमेशा ही रहना,कभी न कहना अलविदा..
(आई शपथ.! काय प्रेम आहे हे..! डोळेच भरून आले?)

पन पन पन… शेवटी दुधात ‘शी’ सॉरी सॉरी ‘माशी’ पडलीच… जे व्हायच तेच झाल मिराने एक दिवस विजूचा फोन सहज चेक केला.. सुरवात Messenger पासुन झाली नंतर WhatsApp पुढे hike आणि त्यानंतर 16 GB’च अतिमहत्वाचं collection पहिल्यांनतर तिथेच त्याचक्षणी ब्रेकपची अंतिम विधि पार पडली… विजुला ‘ब्र’ बोलायला सुद्धा संधी मिळाली नाही. (आणि जनम जनम वाले वादे सरळ चुलित गेले?)
And this time one of the my favourite….?

अजीब दास्ताँ है ये,कहाँ शुरू कहाँ ख़तम
ये मंजिलें है कौन सी,न वो समझ सके न हम… ओ..हीsss… क्या बात है…
अजीब दास्ताँ है ये,कहाँ शुरू कहाँ ख़तम
ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम
(बस बस..! Bdw इथे सगळ समजल म्हणून तर वाट लागली आणि म्हणे “न वो समझ सके न हम”? )

पन खरच, ‘अजिब दासता है ये आयुष्य’.. आता काय ? वही हुवा जो हर स्टोरी में होता है..मीरा तर ब्रेकप नंतर चार दिवसात विजूच्या सख्या मित्राची gf झाली पण विजू परत एकटा झाला (आयुष्यातच.! घरात त्याला एकट्याला सोबत नाहीत?) नुकताच अर्जित सिंग ची गाणी ऐकणारा विजू आता कुमार सणूंचे गाणे ऐकायला लागला आणि त्याला आठवला त्याचा जुना गम का साथी….

“अबी जिंदा हूँ तो जी लेने दो 
भारी बरसात मे पी लेने दो …”
(कडक.! आय मिन हिवाळ्यातल्या कडक उन्हात ह्याला पिल्या मुळे बरसात दिसत असावी, नाहीतर डोळ्यात पाणी आहे म्हणून कदाचित… हा देवदास पेक्षा तर अच्छा सिंगलच बरा होता…?आसो)

अरे थांबा..! स्टोरी इथेच संपत नाही, bdw हीच नाहीतर कुठलीच स्टोरी इथे संपत नाही… मीरा च्या आठवणीत नुकताच खिशाला जरा अराम पडला होता पर दिल अब बैचेन था आणि म्हणून एका लागोपाठ एक बाटल्या रिकाम्या होत होत्या… ही फेस काही दिवस अशीच चालत राहीली ‘पर जनाब होता वही है जो मंजुरे खुदा होता है’…एक दिवस विजूच्या कॉलनीत ‘सोनम’ आली (जी अगोदरच बेवाफा आहे.?) ती पहिल्याच नजरेत विजूला पाहून गालातल्या गालात गोड हसली… वाह.! तिला पाहताक्षणी विजूला वाटलं ‘हीच ती जिला देवाने फक्त माझ्यासाठी बनवलय’ आणि ह्यावेळेस नेहमी प्रमाणे मनातून ‘पक्के वाले प्यार की फिलिंग’ होती… ?
खोल मनातून गाणं वाजलं hahahah.. कोनत.? ते आता तुम्हीच ठरवा… (मी तर आता म्हणेल “ओय राजू प्यार ना करियो, दिल तूट जाता है..?)

टीप : कृपया विजू नामक पात्राचे खापर माझ्यावर फोडू नये, हे सर्व ‘Munna Bhai MBBS’ च्या एका गाण्याला inspire होऊन लिहिलंय… आणि हो.! मी झाकीर खान चा अनुयायी आहे ‘एकदम सक्त लोंढा और हक से सिंगल’ वगैरे…?

 

 

-D4mad

Exit mobile version