Site icon Youth Ki Awaaz

एक विचार- दुर्लक्ष

एक विचार-दुर्लक्ष

आज घरी जायला बराच उशीर झाला कारण म्हणजे आजची ४ तास सतत नाटकाची तालीम आणि नंतर जोरदार पाऊस. घरी आल्यावर वेळ बघितली तर रात्रीचे ११ वाजले होते. पावसामुळे आज घरचे लवकरच झोपले होते, मी झोपायचा विचार केला पण झोप काही येत नव्हती एक वेगळाच विचार मनात गोंधळ करत होता, आता तो विचार कोणता? तो म्हणजे आजच्या तालीम मधल्या चर्चेचा, आज तालीम संपल्यावर जोरदार पावसामुळे सगळे सभागृहातच थांबले होते. आता रिकामा वेळ असल्यामुळे सगळ्यांचा गप्पा गोष्टि सुरु झाल्या आणि काही वेळात आमचे सर (नाटकाचे लेखक/दिग्दर्शक) यांनी सुद्धा आम्हाला ज्वाइन केल. आता महफ़िल पुर्णपणे रंगलेली होती, वेळ असाच थट्टा मस्तीत जात होता तेवढ्यात सरांनी एकदम फ़िल्मी स्टाइल मधे एक डायलॉग म्हटली “अपने जिंदगी का हर लम्हा ऐसे ही जीना दोस्तों, क्या पता कल हो ना हो..”आणि असे म्हणताच त्यांनी आपल्या आयुष्यातील एक अनुभव आम्हाला सांगायला सुरुवात केलि, आता सगळे अतिशय शांत आणि एकचित्त झाले होते.

त्यांनी सांगितले की, त्यांना बालपणा पासुन नाटकाबद्दल खुप प्रेम होत, पुढे ते दिवस-रात्र नाटकाचाच विचार करायचे त्या दरम्यान त्यांनी त्यांचावर प्रेम करणारे मित्र, परिवार, जवळचे नातेवाईक यांना पुरेसा वेळ आणि प्रेम देऊ शकले नाही आणि पुढे आयुष्यात त्यांना या गोष्टीची जाणीव झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितले की, आता जेव्हा मी रंगमंचावर प्रयोग(नाटक) करतो तेव्हा मला लोकांचा भरपुर सकारात्मक प्रतिसाद मिळतो पण कधी कधी त्या लोकांमधे आपल्या जवळच्या लोकांची कमी जाणवते.

कारण त्या वेळेस मी त्यांना वेळ आणि प्रेम या दोन्ही गोष्टि देऊ शकलो नाही आणि आता तेच माझ्या सोबत होत आहे. पुढे ते सांगतात की, आपल्या कामाची आणि यशाची स्तुति करायला जेव्हा भरपुर लोक असुनही त्यामधे जर कोणी आपला जवळचा नसेल तर त्या स्तुतिची वा यशाची खरी मजा अनुभवता येत नाही, हे मला खुप उशिरा लक्षात आले तर तुम्ही असे कधीच करू नका!!
मित्रांनो सरांच्या या अनुभवातुन एक गोष्ट लक्षात येते की, समुद्राच्या लाटा अतिशय वेगाणेे जरी काठावर आल्या तरी त्या लाटा हळुवारपणे परत जातात कारण त्या लाटांची खरी जागा तिथे नसतेच, त्याचप्रमाणे खर जीवन हे बाहेरच्या दुनियेत नसुन ते आपल्या लोकांमधे आहे. इंग्रजीत एक खुप सुंदर सुविचार आहे “happiness is living in the moment and experience it”

तर मित्रांनो आपण आयुष्यात कितीही यशस्वी झालोे तरी प्रयत्न करा की, पाय जमिनीवर राहला पाहिजे. यावर एका शायर ने खुप जबरदस्त लिहले आहे की, _“जिंदगी की उलझने शरारतो को कम कर देती है और हम समझते है कि हम बड़े हो गए_”

ते म्हणतात ना “वक्त के साथ सब कुछ बदल जाता है”, “गेलेली वेळ कधीच परत येत नाही” आणखी बरेच काही. एखाद्या व्यक्तीला जर आपल्या परिस्थिस्तिची खरी जाणीव असेल तर तो आपल्या परिस्थितिला बदलवण्यासाठी रात्रीचा दिवस करुन अथक परिश्रम करतो. मनामधे एकच जिद्द असते आणि त्याच विचाराने तो पुढे जातो, मार्गात अनेक चढाव- उतार, यश अपयश यांचा सामना करतो कारण त्याचा समोर त्याच ध्येय असते आणि शेवटी त्याचा जीवनात ती वेळ येते ज्यासाठी त्यानी एवढी मेहनत घेतली होती, त्यानी जे काही स्वप्न बघितले होते ते त्याला आता प्रत्यक्षपणे पुर्ण होतांना दिसतात, यशाच डोंगर त्याच्या दारी असते, त्याचा जवळच्यांना त्याचा अभिमान असतो.

आता सगळ काही स्टेबल असते पण सगळ काही जवळ असतांना त्याला कुठेतरी काहीतरी सुटल्यासारखे वाटते, जसे एका स्थिर आणि शांत पाण्यामधे हळुवारपणे दगड टाकल्यावर ज्या प्रमाणे पाण्याचे तरंग मागे सरकतात त्याचप्रमाणे तो आपल्या स्थिर आयुष्यात जेव्हा मागे वळुन पाहतो तेव्हा त्याचा लक्षात येते की, त्यानी बरच काही दुर्लक्षित केल होत 
अर्थातच त्यानी आयुष्याला स्थिर करण्यासाठी जी धावपड केली होती त्यात तो काही काळासाठी आयुष्य जगणे विसरला होता. असो, ” कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है” पण जेव्हा लक्षात येते की, “जो खोया वो कुछ पाने से ज्यादा जरुरी था…?” पण आता ती वेळ गेलेली असते तो एक भुतकाळ होता, याचा अर्थ असा नाही की, आता आयुष्य संपल.. सवाल आहे तो फ़क्त वेळेचा?

मित्रांनो वास्तविकता ही कल्पने पेक्षा खुप उलट असते आयुष्याला चांगल बनविण्याचा पाठीमागे आपण लागतो पण त्यामधे खुप काही गोष्टिना दुर्लक्षित करतो.. त्यामधे व्यक्ति, वस्तु, व्यक्तिगत भावना काही अतिशय महत्वाचे आणि परत न येणारे क्षण आणखी बरेच काही. आणि ध्येय गाठायचे असेल तर या सगळ्या गोष्टिना दुर्लक्षित करने खुप गरजेचे आहे त्या शिवाय तर पर्यायच नाही पण ते एका विशष्ट प्रमाणात.

आयुष्यात खुप मेहनत करा खुप आदर आणि पैसा मिळवा, मोठ नाव आणि प्रसिद्धि मिळवा आणि ते करता करता थोळा वेळ स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी काढा नाहीतर शेवटी सगळ काही असुनही काहीच नाही उरेल.. एक बन्दे ने खुदा से पुछा “मुझे जिंदगी से प्यार क्यू नहीं है?” खुदा ने बहुत खुब जवाब दिया की, “तुम्हे कौन कहता है कि तुम जिंदगी से प्यार करो, तुम उसे प्यार करो जो तुम्हे प्यार करता हो जिंदगी अपने आप खुबसुरत लगेगी..”

Exit mobile version