Site icon Youth Ki Awaaz

भाजपच्या कुटील कारस्थानामुळेच सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण रद्द झाले- डॉ. लाखे

भाजपच्या कुटील कारस्थानामुळेच सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण रद्द झाले-काँग्रेस प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील

बीड येथे काँग्रेसची पञकार परीषद
==================
बीड (वार्ताहर)
मराठा आरक्षणाची सत्य घटनात्मक कायदेशीर बाजू मांडण्यासाठी मराठा आरक्षणाचे अभ्यासक,राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील हे शुक्रवार,दिनांक ४ जून रोजी बीड येथे आले होते.यावेळी पञकार परीषदेत बोलताना मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास केंद्रातील भाजप आणि महाराष्ट्रातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेले कुटील कारस्थानच जबाबदार आहे असे काँग्रेस प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील म्हणाले.तर याप्रसंगी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की,मराठा आरक्षणाबाबत तसेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण,वंचित बहुजन समाजाचे पदोन्नतीतील आरक्षण याबाबत भाजपकडून सातत्याने महाराष्ट्राची दिशाभूल केली जात आहे.

डॉ.संजय लाखे पाटील यांचा सध्या मराठवाडा दौरा सुरू असून शुक्रवार,दिनांक ४ जून २०२१ रोजी बीड येथे जिल्हा काँग्रेस कमिटी मार्फत शासकीय विश्रामगृहात आयोजित पञकार परीषदेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी,विधी सेलचे प्रदेश सरचिटणीस
ॲड.कृष्णा पंडीत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पवार,राजीव गांधी पंचायतराज संघटनचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण,तालुकाध्यक्ष महादेव धांडे,शहराध्यक्ष इद्रिस हाश्मी,जिल्हा उपाध्यक्ष शहादेव हिंदोळे,जिल्हा उपाध्यक्ष परवेझ कुरेशी,जिल्हासरचिटणीस ॲड.राहुल साळवे,सेवादल जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष वचिष्ठ बडे,अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष गोविंद साठे,शिरूर तालुकाध्यक्ष सुनिल नागरगोजे,जयप्रकाश आघाव,चरणसिंग ठाकूर,गणेश करांडे,राहूल लोळगे,शेख सिराज आदींसह काँग्रेस पक्ष पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी आयोजित पत्रकार परिषदेच्या सुरूवातीस बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की,प्रारंभी बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांचे आदेशानुसार एसईबीसी आरक्षणाचे अभ्यासक,राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील हे राज्याचा दौरा करीत आहेत.या दौऱ्याची सुरूवात आज बुधवार,दिनांक २ जूनपासून होत असून २ जून ते ५ पर्यंत ते मराठवाड्याचा दौरा करीत आहेत लागे साहेबांचा बीड जिल्ह्याच्या वतीने मागासवर्गीय विभाग जिल्हा अध्यक्ष या नात्याने त्यांचा सत्कार करतांना आम्ही सर्व पदाधिकारी

Exit mobile version